Sunday, November 27, 2011

MPSC-FOR STUDENTS



महाराष्ट्र लोकसेवा आयोग
बँक ऑफ इंडिया इमारत,
महात्मा गांधी मार्ग,
मुंबई  ४०० ००१.
अधिसूचना क्रमांक - २२५१/१४७७/२००६/अठरा//२००४-०६, दिनांक  १६ मे, २००६.
पहा:
1 महाराष्ट्र लोकसेवा आयोग, फाईल क्रमांक : २२५२/१४७७/१८/१९८०-८२, पृ. ५८५

2) महाराष्ट्र शासन,सामान्य प्रशासन विभाग,परिपत्रक क्र.SRV-१०९३/२४०५/प्र.क्र.१३/बारा,दि.१६नोव्हेंबर, १९९३

3) महाराष्ट्र लोकसेवा आयोग, स्थायी आदेश क्र. १९/२००४, दि. २७ डिसेंबर,२००४

4 महाराष्ट्र लोकसेवा आयोग,अधिसूचना क्र-/२००५,दि.२६सप्टेंबर,२००५(फाईल क्र.२२५१/१४७७/२००४-०६/अठरा) 

5) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.  जानेवारी, २००६ रोजीची बैठक आणि फाईल क्र.२२५१/१४७७/२००४-०६/अठरा, मधील पृष्ठ एन-३०६ वरील आदेश

      महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमधील गट-अ तसेच गट-ब मधील अतांत्रिक राजपत्रित पदांवर म्हणजेच उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, पोलीस उपअधीक्षक/सहायक पोलिस आयुक्त,विक्रीकर अधिकारी, मुख्याधिकारी नगरपालिका/नगरपरिषदा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), गट विकास अधिकारी, उपनिबंधक/सहायक निबंधक, (सहकारी संस्था), मंत्रालयातील कक्ष अधिकारी आदी उच्च प्रशासकीय पदांवर हुशार व सक्षम तरुणांची भरती करण्यासाठी आयोगाद्वारे राज्य सेवा परीक्षा घेण्यात येते.  प्रस्तुत स्पर्धा-परीक्षेसाठी 'मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विद्याशाखेतील पदवी'अशी किमान शैक्षणिक पात्रता आणि  १९-३३ वर्षे (मागासवर्गीयांसाठी १९-३८ वर्षे) अशी वयोमर्यादा विहित करण्यात आलेली आहे.  ही स्पर्धा-परीक्षा अ) राज्य सेवा (पूर्व) परीक्षा, ब) राज्य सेवा (मुख्य) परीक्षा (या मुख्य परीक्षेमध्ये ' मौखिक व व्यक्तिमत्व चाचणी ' चा देखील समावेश असतो) अशा दोन भागात घेण्यात येते.  यापैकी राज्य सेवा (पूर्व) परीक्षेची सध्याची योजना आणि अभ्यासक्रम हा१९९४ साली सुधारित करण्यात आला आहे. राज्य सेवा (मुख्य) परीक्षेची विद्यमान योजना व अभ्यासक्रम सुधारित करुन सन २००६ मध्ये व त्यानंतर प्रसिध्द होणार्‍या राज्य सेवा (मुख्य)परीक्षेला लागू करण्याचा प्रस्ताव आयोगाच्या विचाराधीन होता.

2.सध्याची राज्य सेवा (मुख्य) परीक्षेची योजना व अभ्यासक्रम हा १९८०-८१ दरम्यान तयार करण्यात आला असून त्यानुसार सन १९८२ पासून प्रस्तुत मुख्य परीक्षा आयोगाद्वारे घेण्यात येत आहे. प्रचलित योजना व अभ्यासक्रम याबाबत शासन, माजी-आजी IAS / IPS अधिकारी, विषयतज्ञ, उमेदवार तसेच विविध विद्यापीठे व संस्था यांच्याकडून वेळोवेळी प्राप्त झालेले प्रस्ताव / सूचना / तक्रारी / अभिप्राय, याशिवाय संघ लोकसेवा आयोगाद्वारे IAS / IPS / IFS इत्यादी पदांसाठी घेण्यात येणार्‍या भारतीय नागरी सेवा (मुख्य) परीक्षेची प्रचलित योजना व अभ्यासक्रम, खेरीज विद्यापीठ अनुदान आयोग(UGC), अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE), इंडियन कौन्सिल ऑफ ऍग्रीकल्चर रिसर्च, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया, व्हेटर्नरी कौन्सिल ऑफ इंडिया यांनी विहित केलेला त्या त्या विषयाचा आदर्श (model) अभ्यासक्रम तसेच महाराष्ट्रातील विद्यापीठे / परिषदा यांनी त्या त्या विषयासाठी विहित केलेला अभ्यासक्रम इत्यादी समग्र बाबींचा साकल्याने विचार करुन आयोगाने तज्ञ समितीच्या मदतीने राज्य सेवा (मुख्य) परीक्षेची सुधारित योजना व अभ्यासक्रम यांचा मसुदा तयार केला होता. प्रस्तुत मसुद्यास अंतिम रुप देन लागू करण्याआधी सर्वस्तरीय व्यापक विचार होण्याच्या दृष्टीनेप्रस्तुत मसुदा दिनांक २६ सप्टेंबर,२००५ रोजी अधिसूचना जारी करुन संबंधित व्यक्तींच्या, तसेच संस्थांच्या अभिप्रायार्थ इंटरनेटवर प्रसिद्ध करण्यात आला होता. शिवाय याबाबतची अधिसूचना राज्यातील अग्रेसर अशा ३० वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध करण्यात आली होती.
3.उपरोक्त अधिसूचनेच्या अनुषंगाने विषयतज्ञ, संभाव्य उमेदवार, अन्य संबंधित व्यक्ती; शिवाय शासन, विद्यापीठे, संबंधित परिषदा /संस्था यांच्याकडून काही सूचना/दृष्टिकोन/अभिप्रायवजा प्रतिक्रिया लेखी स्वरुपात प्राप्त झाल्या होत्या. त्या सर्व सूचना / दृष्टिकोन/ अभिप्रायवजा प्रतिक्रिया विचारात घे आयोगाने तज्ञ समितीच्या मदतीने राज्य सेवा (मुख्य) परीक्षेची सुधारित योजना व अभ्यासक्रम अनुक्रमे परिशिष्ट - व परिशिष्ट - मध्ये दर्शविल्याप्रमाणे अंतिम करून  विहित करण्याचा तसेच त्यानुसार सन २००६ मध्ये व त्यानंतर प्रसिध्द होणार्‍या राज्य सेवा (मुख्य)परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र  दिनांक १८ डिसेंबर, २००५ रोजी झालेल्या राज्य सेवा (पूर्व) परीक्षेच्या अनुषंगाने घेण्यात येणारी राज्य सेवा (मुख्य) परीक्षा ही असुधारित (प्रचलित) अभ्यासक्रमानुसारच होणार आहे.

ठिकाण : मुंबई १

(स्वाक्षरित)
दिनांक १६ मे, २००६

सचिव,


महाराष्ट्र लोकसेवा आयोग


परिशिष्ट - १
राज्य सेवा (मुख्य) परीक्षेची सुधारित विषय-योजना
 [ २००६ मध्ये आणि त्यानंतर प्रसिध्द होणार्‍या परीक्षेस लागू होणारी ]
राज्य सेवा (पूर्व) परीक्षेत अर्हताप्राप्त होणा-या आणि त्या परीक्षेच्या अधिसूचनेतील शैक्षणिक अर्हता व अन्य अटींची पूर्तता करणा-या उमेदवारांना प्रस्तुत मुख्य परीक्षेस प्रवेश दिला जाईल. प्रस्तुत मुख्य परीक्षा १८०० गुणांची असून ती  १) लेखी परीक्षा (१६०० गुण ) आणि   २) मौखिक आणि व्यक्तिमत्व चाचणी  (२०० गुण ) अशा दोन भागात घेण्यात येईल.
१) लेखी परीक्षा (१६०० गुण )
खाली नमूद केल्याप्रमाणे प्रस्तुत लेखी परीक्षेमध्ये अनिवार्य विषयांच्या  आणि वैकल्पिक विषयांच्या  अशा एकूण  प्रश्नपत्रिका असतील. यापैकी प्रत्येक प्रश्नपत्रिका ही पारंपरिक स्वरुपाची,२०० गुणांची, तासांची असेल. अशाप्रकारे संपूर्ण लेखी परीक्षा ही १६०० गुणांची असेल.
(अ) अनिवार्य विषय (८०० गुण) :- १) मराठी २) इंग्रजी ३) सामान्य अध्ययन- ४) सामान्य अध्ययन- या चार अनिवार्य विषयांची एकेक प्रश्नपत्रिका असेल व प्रत्येक प्रश्नपत्रिका २०० गुणांची असेल.
(ब-१) वैकल्पिक विषय (८००गुण) :- खालील परिच्छेद (ब-२) मध्ये नमूद केलेल्या निर्बंधित गटातील विषयांच्या जोडया वगळता उमेदवारास पुढील यादीतून कोणत्याही दोन वैकल्पिक विषयांची जोडी निवडता येईल.  खालील प्रत्येक वैकल्पिक विषयाच्या दोन-दोन प्रश्नपत्रिका असतील व त्यापैकी प्रत्येक प्रश्नपत्रिका ही २०० गुणांची असेल.
१) कृषि
११) इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी
२१) मेडिकल सायन्स
२) कृषि अभियांत्रिकी
१२) भूगोल
२२) तत्वज्ञान
३) पशुसंवर्धन व पशुवैद्यकशास्त्र
१३) भूशास्त्र
२३) भौतिकशास्त्र
४) वनस्पतीशास्त्र
१४) इतिहास
२४) राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध
५) रसायनशास्त्र
१५) गृहविज्ञान
२५) मानसशास्त्र
६) स्थापत्य अभियांत्रिकी
१६) उद्यानविद्या
२६) लोकप्रशासन
७) वाणिज्य व लेखाशास्त्र
१७) विधि
२७) समाजशास्त्र
८) संगणकशास्त्र
१८) व्यवस्थापन
२८) सांख्यिकी
९) अर्थशास्त्र
१९) गणित
२९) प्राणिशास्त्र
१०) विद्युत अभियांत्रिकी
२०) यंत्र अभियांत्रिकी
०)पुढील पाचापैकी कोणताही एक वाड;मय विषय: मराठी/ हिन्दी/ इंग्रजी/ संस्कृत/ उर्दू
(-१) वैकल्पिक विषयांचे निर्बंधित गट : उमेदवारांना खालील विषयांची जोडी निवडता येणार नाही.
क) ' राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध  आणि ' लोकप्रशासन  '
ख) ' वाणिज्य व लेखाशास्त्र  आणि ' व्यवस्थापन '
ग) ' गणित ' आणि ' सांख्यिकी '
घ) कृषि/ ' पशुसंवर्धन व पशुवैद्यकशास्त्र ' / उद्यानविद्या/कृषि अभियांत्रिकी या चारापैकी दोन विषयांची जोडी.
ड)  'व्यवस्थापन  आणि ' लोकप्रशासन '
च) 'पशुसंवर्धन व पशुवैद्यकशास्त्र  आणि ' मेडिकल सायन्स '
छ) स्थापत्य अभियांत्रिकी/ यंत्र अभियांत्रिकी/  विद्युत अभियांत्रिकी/  इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी/ संगणकशास्त्र  या पाच विषयांपैकी दोन विषयांची जोडी.
ज) मराठी/ हिन्दी/ इंग्रजी/ संस्कृत/ उर्दू या पाच वाड;मयीन विषयांपैकी दोन विषयांची जोडी.
(क) प्रस्तुत लेखी परीक्षेचे माध्यम
(१) सामान्य अध्ययन   , ' वाणिज्य व लेखाशास्त्र ', अर्थशास्त्र, भूगोल, इतिहास, गृहविज्ञान, विधि, व्यवस्थापन, तत्वज्ञान, 'राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध ', मानसशास्त्र,लोकप्रशासन, समाजशास्त्र या विषयांच्या प्रश्नांची उत्तरे उमेदवाराला इंग्रजी किंवा मराठीतून लिहिता येतील.  तसेच या विषयांच्या प्रश्नपत्रिका  इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांमध्ये छापलेल्या असतील.
(२) संस्कृत (वाड;मय) या विषयामधील ज्या प्रश्नांची उत्तरे संस्कृतमध्ये लिहिण्यास सांगितली असतील; ती उत्तरे उमेदवारांनी संस्कृतमध्ये लिहिणे आवश्यक राहील. शिवाय ज्या प्रश्नांची उत्तरे इंग्रजी किंवा मराठीत लिहिण्यास मुभा देण्यात आली असेल त्या प्रश्नांची उत्तरे उमेदवारांनी मराठी अगर इंग्रजीतून लिहावीत.  तसेच प्रस्तुत विषयाच्या प्रश्नपत्रिकेमधील काही किंवा सर्व प्रश्नांच्या सूचना ह्या आवश्यकतेनुसार एकतर संस्कृत भाषेमध्ये अथवा मराठी-इंग्रजी या जोडभाषेमध्ये छापलेल्या असतील; शिवाय प्रस्तुत प्रश्नपत्रिकेमधील काही किंवा सर्व प्रश्न आवश्यकतेनुसार एकतर संस्कृत भाषेत अथवा मराठी -इंग्रजी या जोडभाषेत छापलेले असतील.
(३) मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या वाड;मयीन विषयांच्या, तसेच मराठी (अनिवार्य), इंग्रजी (अनिवार्य) या विषयांमधील प्रश्नांची उत्तरे त्या त्या भाषेत लिहावीत व त्या विषयांमधील एखाद्या प्रश्नाचे उत्तर इंग्रजीतून किंवा मराठीतून लिहिण्यास सांगितले असेल तर त्या प्रश्नांचे उत्तर प्रकरणपरत्वे इंग्रजीमध्येच किंवा मराठीमध्येच लिहिणे आवश्यक राहील.  सदरहू चार वाड;मयीन विषयांची तसेच मराठी (अनिवार्य),इंग्रजी (अनिवार्य) या विषयांची प्रश्नपत्रिका संबंधित भाषेत छापलेली असेल.
(४) अनु.(क १०) ते (क ३) मधील विषय वगळता इतर सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तरे उमेदवारांनी इंग्रजीमधून लिहावीत तसेच या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका फक्त इंग्रजीमध्ये छापलेल्या असतील.
(ड) प्रस्तुत लेखी परीक्षेचे मानक (दर्जा)
(१) मराठी  (अनिवार्य) तसेच इंग्रजी  (अनिवार्य) या विषयांचे मानक (दर्जा) उच्च माध्यमिक शालांत  परीक्षेसमान असेल.
(२) सामान्य अध्ययन-, सामान्य अध्ययन- तसेच सर्व वैकल्पिक विषयांचे मानक (दर्जा) पदवी परीक्षेसमान असेल.
२) मौखिक व व्यक्तिमत्व चाचणी (२०० गुण)
जे उमेदवार लेखी परीक्षेत अर्हताप्राप्त होतील अशाच उमेदवारांना प्रस्तुत चाचणी परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल.  प्रस्तुत चाचणी फक्त दोनशे गुणांची असेल.




No comments:

Post a Comment

Followers

Total Pageviews